IPL 2024 (GT vs DC Match 40, Rishabh Pant) : ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधारपदाची खेळी खेळली. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने नाबाद 88 धावा केल्या. पंतच्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात पंतने अनेक विक्रम केले. त्याला रोखणे कोणत्याही गोलंदाजासाठी कठीण जात आहे. पंत या मोसमात दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यासह या मोसमात दोनदा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.
गुजरातविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 224 धावा केल्या. यादरम्यान ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 43 चेंडूंचा सामना करत 88 धावा केल्या. अक्षर पटेलने 66 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात गुजरातच्या खेळाडूंना 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 220 धावा करता आल्या. ऋषभ पंतला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
पंतच्या नावावर नोंदवले गेले अनेक विक्रम…
या मोसमात ऋषभ दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 9 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. एकूण यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंत सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज आहे. या मोसमात कर्णधार म्हणून सर्वाधिक 21 षटकार ठोकणारा ऋषभ हा खेळाडू आहे. या हंगामात तो एकमेव कर्णधार आहे ज्याला 2 सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत.
IPL Playoffs Scenario 2024 : राजस्थानला केवळ एका विजयाची गरज, तर ‘या’ संघांना प्लेऑफ गाठणे कठीण….
‘या’ मोसमात पंतची दमदार कामगिरी…
या मोसमात ऋषभची कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 9 सामन्यात 342 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. पंतने गुजरातविरुद्ध 88 धावांची नाबाद खेळी खेळली होती. हैदराबादविरुद्ध त्याने 44 धावा केल्या होत्या. लखनौविरुद्ध 41 धावांची इनिंग खेळली. पंतने चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. त्याने KKR विरुद्ध 55 आणि CSK विरुद्ध 51 धावा केल्या.