14 जूनला अक्षय कुमारच्या “खिलाडीयों के खिलाडी’ला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या सिनेमाबाबत अक्षय कुमारने एक मोठा खुलासा केला आहे. या सिनेमात अक्षयने ढब्लूडब्लूएफमधील फायटर द अंडरटेकर बरोबर फाईट केल्याचा सीन खूप गाजला होता.
याचसंदर्भात अक्षयने हा खुलासा केला आहे. या फाईट सीनमध्या अक्षयने अंडरटेकरबरोबरच फाईट केली होती असेच प्रेक्षक मानत आहेत. मात्र प्रत्यक्ष्यात हा खेळाडू म्हणजे अंडरटेकर नव्हता. तर ब्रायन ली हा रेसलर होता.
अक्षयने सोशल मीडियावरच्या एका पोस्टमध्ये हा खुलासा केला आहे. एवढेच नव्हे तर त्याने एक मीमदेखील शेअर केले आहे. या मीममध्ये ब्रॉक लेसनर, ट्रिपल एच, रोमन रेस यांच्याबरोबर अक्षयने स्वतःचा फोटो शेअर केला आहे.
ज्याने अंडरटेकरला हरवे आहे त्याने हात वर करावा, असे अक्षयने म्हटले आहे. “खिलाडियों के खिलाडी’मध्ये अक्षय कुमार आणि रेखा यांनी लीड रोल केले होते. 29 वर्षाच्या अक्षयने 42 वर्षाच्या रेखाबरोबर रोमान्स केला होता.