शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपच्या पाठींब्यावर मंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना संपत चालली आहे. मुख्यमंत्री आमचा असूनही आम्हाला निधी मिळत नाही, उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत अशा अनेक तक्रारी बंडखोर आमदारांनी शिंदे गटात सामील होताना केल्या. मात्र आता शिवसेना बंडखोर आमदाराने थेट ठाकरेंच्या बॉडीगार्डने आपल्याला त्यांच्या समोरच धक्का दिल्याचा आरोप केला आहे.
मातोश्रीवर केवळ बैठक असेल तरच प्रवेश दिला जात होता. इतर वेळी आम्हाला भेटीसाठी वेळ मागूनही मिळत नव्हता नसल्याची कबुली शिवसेना बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक आमदारांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करत शिवसेना नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होत.
गायकवाड यांनी देखील नाराजीच्या स्वरात आपली कहाणी सांगितली आहे. एकदा मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली. परंतु तीदेखील मिळाली नाही. मला उद्धव ठाकरेंसमोरच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्का मारत मागे ढकललं. तरीही ठाकरे काही म्हणाले नाही. हे आम्ही भोगलंय असा खुलासा गायकवाड यांनी केला.
शिवसेनेतील बंडानंतर अनेक आमदारांनी अप्रत्यक्षपणे आपले गाऱ्हाणे मिडीसमोर किंवा सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्याचं पाहायला मिळाल. ११ जुलै रोजी शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या रद्दतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेला आपले नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे.