नवी दिल्ली – गाझामधील सुरक्षिततेची जबाबदारी इस्रायल (Israel) अनिश्चित काळापर्यंत स्वीकारायला तयार आहे, अशी हमी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी दिली आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो जण मरण पावले आहेत आणि या संपूर्ण भूभागावर अनिर्बंध नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने चढाई सुरू ठेवली आहे. (Israel war)
सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेतान्याहू यांनी गाझामध्ये मदत पोचवण्यासाठी आणि ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी युद्ध अल्पकाळासाठी स्थगित करण्याचे संकेतही दिले आहेत. मात्र ओलीस ठेवलेल्या सर्व इस्रायलींच्या सुटका होत नाही, तोपर्यंत युद्ध (War) पूर्णपणे थांबवण्याची शक्यता त्यांनी पेटाळून लावली आहे. मानवतावादी मदत पोचवण्यासाठी इस्रायलने अमेरिकेबरोबर कोणतीही तडजोड झाल्याचे व्हाईट हाऊसने फेटाळून लावले आहे.(Israel hamas)
आठवड्याभरापासून इस्रायलचे सैन्य गाझामध्ये (Gaza) घुसले असून गाझा सिटीला सैन्याने पूर्ण वेढा घातला आहे. गाझा सिटीचा उत्तर गाझा पट्ट्याशी असलेला संपर्कही तोडून टाकण्यात आला आहे. अन्न, पाणी, औषधांची टंचाई असलेल्या या भागात आवश्यक मदत पोचवण्यासाठी इस्रायलकडून अजूनही सुविधा दिल्या जात नाहीत. युद्धामध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या आता 10 हजारांपुढे गेली आहे. (Israel Army)
हमासला पूर्ण नष्ट करणे हे इस्रायलचे उद्दिष्ट आहे. ज्यांना हमासचा मार्ग चालू ठेवायचा नाही त्यांनीच गाझावर राज्य केले पाहिजे. गाझाच्या सुरक्षिततेची जबाबदारी अनिश्चित काळापर्यंत इस्रायलवरच असेल. कारण जेंव्हा आम्ही ही जबाबदारी घेतली नव्हती तेंव्हाच हमासच्या दहशतवादी राजवटीचा उदय झाला होता.
– बेन्जामिन नेतान्याहू, पंतप्रधान इस्रायल