#व्हिडीओ : लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर चार प्रवासी डब्यांसह वेगाची चाचणी

आठवडाभरात नियमित प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता

लोणंद – फलटणचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून अवघ्या चाळीस दिवसांत लोणंद फलटण मार्गावर रेल्वे धावणार असल्याचा शब्द महिन्यातच पूर्ण केला आहे. त्यानुषंगाने लोणंद-फलटणकर जनतेचे रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने आज मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकत लोणंद ते फलटण मार्गावर रेल्वेच्या चार प्रवासी डब्यांसह वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेतली.

माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधून रेल्वे सुरू होण्यासाठी मोठा संघर्ष केला. लोकसभेत वारंवार आवाज उठवून रेल्वेमार्गाला मंजुरी मिळविली. त्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता. त्याची परिणीती लोणंद ते फलटण रेल्वेमार्ग पूर्ण होऊन रेल्वे विभागाकडून या मार्गावर वारंवार रेल्वे इंजिनच्या चाचण्या घेतल्या गेल्या. आज रेल्वेची प्रवासी डब्यांसह चाचणी घेण्यासाठी खास पुण्याहून रेल्वेगाडी आली. लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावर धावलेल्या या रेल्वेगाडीत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या मार्गावर वेगाची व मार्गाच्या क्षमतेची चाचणी घेण्यात आली. रेल्वे पाहण्यासाठी लोणंद ते फलटण मार्गावर जनतेने गर्दी केली होती.

येत्या आठवडाभरात लोणंद-फलटण मार्गावरून प्रत्यक्ष रेल्वे प्रवास नियमित सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. लवकरच फलटण ते बारामती व फलटण ते पंढरपूर रेल्वेमार्गाचेही कामे सुरू होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)