सिव्हिलमध्ये रांगोळीद्वारे एचआयव्ही बाबत जनजागृती

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा : विद्यार्थिनी वैष्णवी आगासे स्पर्धेत प्रथम

नगर – आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात जिल्हा रुग्णालयाकडून एचआयव्ही बाबत युवक-युवती मध्ये जनजागृती व्हावी यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात घेण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेमध्ये 7 महाविद्यालयातील एकूण 52 विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. रांगोळीच्या माध्यमातून एचआयव्ही तपासणी चे महत्व,ए.आर.टी. उपचाराचे महत्व व एचआयव्ही प्रतिबंधाचे मार्ग इत्यादी मांडण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक राधाबाई काळे महाविद्यालयाच्या वैष्णवी आगासे या विद्यार्थीनींन पटकावला. तर द्वितीय क्रमांक प्रगत कला विद्यालयाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आदिल शेख याने पटकावला. तृतीय क्रमांक राधाबाई काळे विद्यालयातील अकरावीची विद्यार्थ्यांनी कावेरी भोसले व अ.ए.सो.अध्यापन विद्यालयाची विद्यार्थ्यांनी वर्षा भडकवाडे यांना विभागून देण्यात आला.

उत्तेजनार्थ बक्षीस रेसिडेन्सील ची प्रीती तळेकरला देण्यात आले. अशा वेगवेगळ्या माध्यमातून एचआयव्ही बाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. पी.एम.मुरंबीकर यांनी दिली. स्पर्धेचे नियोजन जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.