श्रीनगर – काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे. त्या जिल्ह्याच्या अवंतीपुरा येथील बरगम भागात काही संशयित व्यक्ती आल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाची पुर्ण नाकेबंदी करून घराघरात तपासणी मोहीम हाती घेतली होती.
त्यावेळी एका घरातून सुरक्षा जवानांवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. त्यावेळी सुरक्षा जवानांनी तेथे गोळीबार केला त्यात एक दहशतवादी मारला गेला. त्या ठिकाणी अजून काही दहशतवादी लपले आहेत काय याचा शोध घेतला जात आहे.
तो एकटा नसावा त्याच्याबरोबर त्याचे अन्यही काही दहशतवादी लपले असावेत असा सुरक्षा जवानांचा कयास आहे. त्यामुळे तेथील तपासणी मोहीम दिवसभर चालू होती.