अमरावती – ओमायक्रॉनने आता आंध्रप्रदेशातही शिरकाव केला आहे. तेथील एक 34 वर्षीय रूग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. हा रूग्ण आयर्लंड मधून प्रवास करून आला होता.
हा रूग्ण जेव्हा मुंबईत उतरला त्यावेळी त्याची तेथे चाचणी घेण्यात आली होती. पण त्यावेळी त्यात तो निगेटीव्ह आढळला होता. त्यानंतर त्याला विशाखपट्टणम येथे जाण्याची अनुमती देण्यात आली होती.
त्यानुसार तो 27 नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुढील प्रवासाला निघाला होता. विझीनगरम येथे त्याची दुसरी चाचणी घेण्यात आली त्यात तो पॉझिटीव्ह आढळला. त्यावेळी मात्र त्याची सॅम्पल्स पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यात मात्र त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे या रूग्णाची काल पुन्हा जेव्हा चाचणी घेण्यात आली त्यात मात्र तो कोविड निगेटीव्ह आढळला आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाची धास्ती कमी झाली आहे. विदेशातून आंध्रात आलेल्या रुग्णांपैकी पंधरा जण कोविड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यापैकी कोणी ओमायक्रॉनचा बाधित आहे काय याची तपासणी केली जात आहे.