कुलगाम – जम्मू-काश्मीरमध्ये गेल्याचे काही दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आणखी एका व्यक्तीची हत्या केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव विजय कुमार असून ते बँक मॅनेजर होते. ते मूळचे राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथील स्थानिक बँकेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात कुमार यांना गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकेबंदी केली.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत, “राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी असलेल्या विजय कुमारची जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेली हत्या अत्यंत निंदनीय आहे. त्यांच्या आत्म्याला शांती आणि कुटुंबाला धैर्य मिळावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” असा संदेश दिला आहे.
“काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात एनडीए सरकार अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी. दहशतवाद्यांकडून आमच्या नागरिकांची अशी हत्या खपवून घेतली जाणार नाही.” असं म्हणत मुख्यमंत्री गेहलोत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
जम्मू कश्मीर के कुलगाम में कार्यरत हनुमानगढ़, राजस्थान के निवासी श्री विजय कुमार की आतंकियों द्वारा हत्या घोर निंदनीय है। मैं ईश्वर से उनकी आत्मा की शांति एवं परिवार को हिम्मत देने की प्रार्थना करता हूं।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 2, 2022
पोलीस कर्मचाऱ्याला गोळ्या घालून केलं जखमी
याआधी 7 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून जखमी केले होते. या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “शहरातील सफाकदल भागातील ऐवा पुलाजवळ सकाळी 8.40 च्या सुमारास दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलवर गोळीबार केला. या हल्ल्यात हवालदार गंभीर जखमी झाला.” अधिकाऱ्याने सांगितले की हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
#WATCH | J&K: Terrorist fires at bank manager at Ellaqie Dehati Bank at Areh Mohanpora in Kulgam district.
The bank manager later succumbed to his injuries.
(CCTV visuals) pic.twitter.com/uIxVS29KVI
— ANI (@ANI) June 2, 2022