नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. सुरजेवाला म्हणाले की, बुधवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांना ताप आला होता. तापाची हलकी लक्षणं समोर आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याच स्पष्ट झालंय. सध्या सोनिया गांधी घरीच आयसोलेट आहे.
काँग्रेस नेते रणदिव सुरजेवाला म्हणतात की, गेल्या आठवड्यात सोनिया गांधी काँग्रेस पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत होत्या. बुधवारी संध्याकाळी ताप आल्यानंतर त्यांनी कोविड-19 केली असता पॉझिटिव्ह आली.
यापूर्वी फुफ्फुसाचा संसर्ग त्यांना झाला होता
सोनिया गांधी यांना याआधीही फुफ्फुसाचा संसर्ग झाला आहे. 2014 मध्ये त्यांना राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दिल्लीच्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी सोनिया गांधी गोवा गेल्या होत्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये, छातीत जंतुसंसर्ग झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीच्या प्रचंड प्रदूषणातून बचावासाठी गोव्याला मुकामी गेल्या होत्या. छातीत जंतुसंसर्ग झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रदूषणापासून दूर जाण्याचा सल्ला दिल्याचेही यापूर्वी चर्चा होत्या.