इस्लामाबाद – तेल कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासह पाकिस्तानात दोन दहशतवादी घटनांत किमान 20 सैनिक मरण पावले.
पहिला हल्ला बलुचिस्तानमध्ये झाला. त्यात रॉकेट लॉंचरसह शस्त्रसस्ज सात दहशतवाद्यांनी सरकारी मालकीच्या ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ताफ्यावर हल्ला चढवला. त्यात सीमावर्ती भागात तैनात असणारे आणि या ताफ्याला संरक्षण देणारे सात सैनिक आणि सात खासगी सुरक्षा रक्षक मरण पावले. ओरमाराजवळ कोस्टल महामार्गावर हा हल्ला करण्यात आला.
मात्र, कंपनीचे कर्मचारी या हल्ल्यात सुरक्षित राहिले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारली नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटनेने हे हल्ले घडवले असावेत असा संशय आहे. हे हल्ले घडवून बलुचिस्तानचे स्थैर्य आणि शांततेला बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असे पाकिस्तानी लष्कराने सांगितले.
दुसरा हल्ला वझिरीस्तानमधील राझमाक येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यात सहा सैनिक मरण पावले. त्यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. दोन दिवसांपुर्वीही या भागात केलेल्या हल्ल्यात दोन सैनिक मरण पावले होते.