चंदीगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्यापूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमध्ये दहशत माजवण्याच्या पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) कटावरून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असल्याचा महत्त्वपूर्ण इशारा देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी जारी केला आहे. अलर्टनुसार चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशतवादी हल्ला करू शकतात. दहशतवादी बसस्थानकाला लक्ष्य करू शकतात.
पंजाब हादरवण्याचे षडयंत्र
गुप्तचर यंत्रणांनी राज्य पोलीस, जीआरपी आणि राज्य गुप्तचर यंत्रणांना आपापसात समन्वय साधून इनपुटवर काम करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा मोठा कट रचल्याची गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने मोठी बातमी आहे.
पंजाबचे 10 नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट आहे. आयएसआयने चंदीगड आणि मोहालीमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट रचला आहे. पंजाबमधील 10 नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्र सरकार त्यांना सुरक्षा देऊ शकते.
पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत एजन्सी सतर्क
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहाली दौऱ्याबाबत एजन्सी अलर्टवर आहेत. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ज्या लोकांशी आयएसआयचे संबंध आहेत त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.