यूपीएससी अध्यक्षांचा कालावधी 4 एप्रिल 2022 पर्यंत

नवी दिल्ली – यूपीएससीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीकुमार जोशी यांनी काल आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांची या पदासाठीची मुदत 4 एप्रिल 2020 पर्यंत राहणार असल्याचे आज अधिकृतपणे घोषित करण्यात आले. ते 12 मे 2015 रोजी यूपीएससीचे सदस्य झाले आहेत. ती तारीख गृहीत धरून त्यांचा कार्यकाळ निर्धारित करण्यात आला आहे.

जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्याने त्यांची सदस्यत्वाची जागा रिक्‍त झाली असून त्यांच्या जागी आता लवकरच नवीन सदस्य नियुक्‍त केला जाणार आहे. सध्या भीमसेन बस्सी, एअर मार्शल ए. एस. भोसले, सुजाता मेहता, मनोज सोनी, स्मिता नागराज, एम. सथीयवथी, भारत भूषण व्यास, टीसीए अनंत, आणि राजीव नारायण चौबे हे यूपीएससीवर सदस्य म्हणून काम पहात आहेत.

या आयोगातर्फे प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि अन्य रॅंकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.