टेनिस स्पर्धा : निधी, वंशिता, बेला, सोहा यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा

पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आयोजित व आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्यावहिल्या 3000डॉलर पारितोषिक रकमेच्या फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धेत निधी चिलूमुला, वंशिता पठानिया, बेला ताम्हणकर, सोहा सादिक या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या बेला ताम्हणकर हिने आरती मुनियनचा 6-4, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

अतितटीच्या झालेल्या लढतीत वंशिता पठानिया याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या आलिया इब्राहिमचा टायब्रेकमध्ये 2-6, 6-3, 7-6(5) असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना 3 तास चालला. अव्वल मानांकित साई संहिता हिने अविका सागवालला 6-1, 6-2 असे नमविले.
तर, रिया उबवेजा हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आलायका इब्राहिमचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सोहा सादिकने सुदिप्ता कुमारचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.

संक्षिप्त धावफलक

दुसरी फेरी – महिला गट – साई संहिता (भारत) वि.वि. अविका सागवाल (भारत) 6-1, 6-2, रिया उबवेजा (भारत) वि.वि. आलायका इब्राहिम (भारत) 6-0, 6-0, निधी चिलूमुला (भारत) वि.वि. श्रीवल्ली भामिदिप्ती (भारत) 6-1, 6-2, वंशिता पठानिया (भारत) वि.वि. आलिया इब्राहिम (भारत) 2-6, 6-3, 7-6(5), सोहा सादिक (भारत) वि.वि. सुदिप्ता कुमार (भारत) 6-3, 6-2, प्रतिभा नारायण प्रसाद (भारत) वि.वि. प्रियम कुमारी (भारत)6-1, 6-2, बेला ताम्हणकर (भारत) वि.वि. आरती मुनियन (भारत) 6-4, 6-3, वैदेही चौधरी (भारत) पुढे चाल वि. मालविका शुक्‍ला(भारत).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.