Tennis | ज्युनिअर टेनिस स्पर्धेस आजपासून प्रारंभ

तीन लाख रुपयांची खेळाडूंना शिष्यवृत्ती

मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 15 व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत देशभरातून 250 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा जी. ए. रानडे टेनिस कॉम्प्लेक्‍स येथे 6 ते 13 या कालावधीत रंगणार आहे. गतवर्षी जगभरात कोविड या महामारीचा प्रसार होण्यापूर्वी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेत पारितोषिकांसह पहिल्या फेरीपासून खेळाडूंना एकूण 3 लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ही स्पर्धा एआयटीएचे सचिव आणि माजी एमएसएलटीएचे मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येत असते. या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार पातळीवर टेनिसच्या प्रसारासाठी नक्कीच मदत होईल, असे भरत ओझा यांनी सांगितले.

स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ 64 चा असून तर मुलींच्या गटातील मुख्य फेरीचा ड्रॉ 48 चा आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 6 व 7 मार्च रोजी होणार असून मुख्य फेरी सोमवारी प्रारंभ होणार आहे. तसेच, राष्ट्रीय, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या नियमांनुसार व स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया, एमवायएएस, क्रीडा व युवक सेवसंचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे संचालक मनोज वैद्य असून स्पर्धा निरीक्षक म्हणून वैशाली शेकटकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, सोनल वैद्य यांनी मुख्य रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.