Tennis | कुमार टेनिस स्पर्धा आजपासून

पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 आणि 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर आणि महाराष्ट्र मंडळ टेनिस कोर्ट मुकुंदनगर या ठिकाणी आजपासून रविवारपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेत एकूण 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.