पुणे – शहरात सोमवारी दिवसभरात नवीन 202 जण करोना बाधित आढळले. तर, बरे झालेल्या 336 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक पुण्याबाहेरील आहे.
पुण्यातील करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या काही अंशी कमी होऊन 5 हजार 19 पर्यंत आली आहे. यापैकी 1 हजार 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. 414 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 253 जणांना व्हेंटिलेटरचा सपोर्ट देण्यात आला आहे.
आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाग 72 हजार 280 वर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 62 हजार 625 बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभरात 1 हजार 911 संशयितांची तपासणी करण्यात आली.