रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

रायगड – रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 15 जुलै ते 24 जुलै या कालावधीत असेल, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा साडेसात हजारांवर गेला आहे. त्यामुळे 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत दहा दिवसांसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

या कालावधीत केवळ अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू राहणार आहेत. यासंबंधीचा निर्णय सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.