-->

तापमान बदलाने आरोग्य बिघडले

पुणे – राज्यात कोकण किनारपट्टी ते विदर्भापर्यंत तयार झालेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव निवळल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे झाले आहे.

पुण्यासह बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली आहे. मात्र, तापमानात चढ-उतार होत असल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होत असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडसर निर्माण झाल्याने राज्यात सर्वदूर थंडीचा प्रभाव ओसरला होता. तसेच तापमानात वाढ होत असल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.

मात्र, आता या कमी दाबाच्या क्षेत्राचा पट्टा निवळल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे झाले आहे. मात्र, थंडी परतण्याची शक्‍यता धुसर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.