टेन्शन वाढतंय ! लातूरमध्ये एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित ;प्रशासन पुन्हा सतर्क

सर्व विद्यार्थी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल

लातूर: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत मराठवाड्यातील लातूर शहरात एकाच वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लातूर महापालिकेने ४२० विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीचे रिपोर्ट आता समोर आले असून ४० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं. पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोनाची प्रकरणं ज्या भागामधून आली ते सर्व भाग एकमेकांशी संबंधित आहेत. अमरावती हा ग्रामीण भाग आहे. ज्याठिकाणी कॉन्टॅक्स ट्रेसिंगचे प्रमाण खूप कमी आहे. हेच प्रमुख कारण आहे की हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अशीच परिस्थिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.