नवी दिल्ली – तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana vidhansabha) मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. (5 cr seized in car) या रोख रकमेबाबत कार चालकाला विचारणा केली असता ते या रोख रकमेचा कोणताही हिशेब देऊ शकले नाहीत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. (mountain of notes)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यावर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले. ही रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.(Cash befor election)
यापूर्वी निवडणूक आयोगाने सांगितले होते की, 5 राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून सुमारे 1760 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. 2018 मध्ये या 5 राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण 7 पट अधिक आहे. निवडणूक आयोग राज्य आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अशा कारवाया करतो. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या घोषणेनंतर मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमधून 1760 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 2018 मध्ये या राज्यांमधून 239.15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालॅंड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये 1400 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या 11 पट हे प्रमाण आहे.