KCR – तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस प्रमुख केसीआर यांना शुक्रवारी पहाटे यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळलेल्या माहितीनुसार एररावल्ली फार्महाऊसमध्ये पडल्याने केसीआर जखमी झाले आहे. केसीआर यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंबरेच्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
Telangana BRS MLC K Kavitha tweets “BRS supremo KCR Garu sustained a minor injury and is currently under expert care in the hospital. With the support and well-wishes pouring in, Dad will be absolutely fine soon.” pic.twitter.com/Y9m2EHrqqO
— ANI (@ANI) December 8, 2023
त्यांची मुलगी आणि बीआरएस एमएलसी के. कविता यांनी ट्विट करत याबाबत सांगितले आहे की,’बीआरएस प्रमुख केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली असून सध्या तज्ञ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करत आहेत. तुमच्या प्रार्थनेने वडील लवकर बरे होतील.’
केसीआरच्या दुखापतीची बातमी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री श्री केसीआर गारु जखमी झाल्याचे जाणून दुःख झाले. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.” वृत्तानुसार, निवडणूक पराभवानंतर केसीआर त्यांच्या फार्महाऊसवर होते. गेल्या 9 वर्षांपासून ते जिथे राहत होते ते घर आणि ऑफिस त्यांनी रिकामे केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या फार्म हाऊसवर नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते.