Tejas Fighter Jet – भारतीय वायुसेनेचे तेजस हलके लढाऊ विमान मंगळवारी राजस्थानमधील जैसलमेरजवळ ऑपरेशनल ट्रेनिंगच्या वेळी कोसळले अशी माहिती हवाई दलाच्यावतीने देण्यात आली. तथापि हे विमान कोसळत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने स्वत:ची सुरक्षित सुटका करून घेतली. त्यामुळे तो बचावला आहे.
अपघाताचे कारण लगेच समजू शकले नाही, ते शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. तेजस हे पुर्ण भारतीय बनावटीचे आधुनिक लढाऊ विमान आहे. हवाईदलात त्याची एक स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे.
अलिकडच्या काळात या विमानाला झालेला हा पहिलाच अपघात आहे. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन विमानाचे अवशेष संकलीत केले. या अवशेषांमुळे जमीनीवरील रहिवाशांची सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. । Tejas Fighter Jet