Chennai Super Kings Squad For IPL 2024 : आयपीएल 2024 चा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. मेगा स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपले स्क्वॉड पूर्णपणे तयार केले आहे. चेन्नई संघाने गेल्या वर्षीच्या तुलनेत आगामी हंगामासाठी मोठे बदल केले. चेन्नईने लिलावादरम्यान 8 खेळाडूंना सोडले होते. यानंतर लिलावात ६ खेळाडूंवर त्यांनी दाव लावला आहे.
स्टोक्स आणि प्रिटोरियस यांनाही केलं रिलीज…
सीएसकेने स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ड्वेन प्रिटोरियससह 8 खेळाडूंना सोडले(रिलीज) होते. गेल्या वर्षी अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्यांचे नावही या यादीत सामील झाले होते. या यादीत न्यूझीलंडच्या काइल जेमिसनचेही नाव होते. 8 खेळाडूंना मुक्त( रिलीज) केल्यानंतर, चेन्नईने लिलावादरम्यान मोठ्या खेळाडूंवर दावही लावले, ज्यामध्ये डॅरिल मिशेल सर्वात महागडा ठरला.
मिशेलवर खर्च केले 14 कोटी रुपये…
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेल त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो. 2023 च्या विश्वचषकात मिचेलने बॅटने दमदार खेळी केली. त्याच वेळी, त्याने अनेक वेळा चेंडूसह आपली छाप सोडली. त्याची क्षमता पाहून चेन्नईने मिशेलवर 14 कोटी रुपये खर्च केले. याशिवाय सीएसकेने टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर आणि न्यूझीलंडचा युवा सलामीवीर रचिन रवींद्र यांच्यावरही मोठा दांव खेळला. रचीनवर 1 कोटी 80 लाख रुपये खर्च झाले, तर शार्दुलला 4 कोटी रुपयांसह धोनीच्या सैन्यात प्रवेश मिळाला.
IPL 2024 : आयपीएलसाठी पंतला ग्रीन सिग्नल; मात्र ‘या’ बाबतीत संभ्रम अद्याप कायम…
आयपीएल 2024 साठी CSK ची संपूर्ण टीम…
अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महेश दीक्षाना, मथिशा पाथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी (कर्णधार), मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हुंगरगेकर, रवींद्र जडेजा, रुविंद्र जडेजा, रविंद्र शेखर , शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, डॅरिल मिशेल समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, रचिन रवींद्र, अविनाश राव अरावली.