ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) ने आपल्या व्हर्च्युअल असिस्टंट ‘अलेक्सा’कडून विचारल्या जाणार्या प्रश्नांची माहिती दिली आहे. कंपनीने 2022 मध्ये अमेझॉनच्या अलेक्साला भारतीय वापरकर्त्यांनी विचारलेले सुमारे 70 मनोरंजक आणि भन्नाट प्रश्न सांगितले आहेत.
भारतीय युजर्सनी अलेक्साला सलमान खानच्या लग्नापासून त्याच्या लव्ह लाईफपर्यंतचे प्रश्न विचारले. इतकेच नाही तर लोकांनी अलेक्साला विचारले की तिचे तोंड कुठे आहे आणि तू माझा गृहपाठ करू शकतेस का?
सर्वात उंच माणसापासून ते बुर्ज खलिफापर्यंत ‘हे’ प्रश्न विचारले होते!
कंपनीने जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान अलेक्साला विचारलेल्या प्रश्नांबद्दल सांगितले आहे. यासोबतच कंपनीने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादीही शेअर केली आहे. सामान्य ज्ञानाबद्दल बोलताना, अलेक्साला पृथ्वीवरील सर्वात उंच व्यक्तीपासून बुर्ज खलिफापर्यंतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. लोकांनी अलेक्साला क्रिप्टोपासून ते सोने आणि बिटकॉइनच्या दरांपर्यंतची माहितीही विचारली आहे.
‘अलेक्साचे तोंड कुठे आहे?’
भारतीय वापरकर्त्यांनी अलेक्साला अनेक मनोरंजक आणि अनोखे प्रश्नही विचारले आहेत. लोकांनी अलेक्साला तिचे तोंड कुठे आहे असे विचारले. तसेच लोकांनी विचारले की ती त्यांचे गृहपाठ करू शकते का ? याशिवाय लोकांनी ट्विटरच्या संस्थापकापासून ते श्रीलंकेच्या भाषेपर्यंत प्रश्न विचारले आहेत.
‘सलमान खान लग्न कधी करणार आहे ?’
एवढेच नाही तर लोकांनी अभिनेत्री कतरिना कैफच्या आयुष्यापासून ते सलमान खानच्या लव्ह लाईफपर्यंतचे प्रश्न विचारले आहेत. लोकांनी विचारले, सलमान खान लग्न कधी करणार? कोण आहे सलमान खानची गर्लफ्रेंड? सलमान खान कुठे राहतो? जॉन सीना किती मजबूत आहे? पाणी ओले का आहे? शोले चित्रपटातील डायलॉग ऐकव, कोण आहे रॉकी भाई? असे अनेक प्रश्न अलेक्साला विचारले.
#WPLAuction2023 : लिलावात भारतीय महिला खेळाडूंची कोटींची उड्डाणे; स्मृती मानधनाला RCB ने…
‘आलिया भट्टचे वय किती आहे?’
लोकांनी अलेक्साला आलिया भट्टच्या वयाबद्दलही विचारले आहे. भारतीय वापरकर्त्यांनी अलेक्साला अनुष्का शर्माच्या मुलीचे नाव विचारले. तसेच लोकांनी अलेक्साला डुग्गू आणि मिस्टर बीस्टची माहिती विचारली. लोकांनी अलेक्साला कुकिंग टिप्स देखील विचारल्या आहेत. लोकांनी अलेक्साला मसाला चहापासून चिकन करीपर्यंतच्या पाककृती विचारल्या.