भारतीय रेल्वेमध्ये दररोज करोडो लोक प्रवास करतात. प्रवाशांना अप्रतिम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक सोयी-सुविधा दिल्या आहेत. त्याचबरोबर काही नियमदेखील केले आहेत. या कारणास्तव, इतर कोणत्याही मार्गाने प्रवास करण्याऐवजी, लोक भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकवेळा प्रवासी रस्त्याच्या मधोमध उतरण्यासाठी रेल्वेची साखळी ओढत असल्याचे प्रकार घडताना दिसून येतात.
रेल्वेची चेन (साखळी) विनाकारण ओढणे खरे तर बेकायदेशीर आहे. रेल्वेची साखळी ओढल्याने रेल्वे रुळावरून घसरण्याचा धोका आहे. असे करताना तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला त्या खास परिस्थितींबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही चेन खेचू शकता वा ट्रेन पुलिंग करू शकता. जर तुम्ही नियमितपणे भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करत असाल तर अशा परिस्थितीत, तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. चला, याबद्दल जाणून घेऊया.
आपण ट्रेनमध्ये चेन कधी ओढू शकतो?
1. प्रवास करताना एखाद्या प्रवाशाचे मूल स्टेशनवर मागे राहिल्यास अशा स्थितीत प्रवासी ट्रेनची अलार्म चेन ओढू शकतो.
2. ट्रेनमध्ये आग लागल्यास या स्थितीत तुम्ही ट्रेनची अलार्म चेन खेचू शकता.
3. वृद्ध किंवा अपंग व्यक्ती ट्रेनमध्ये चढत असताना जर ट्रेन सुटली तर या स्थितीत तुम्ही ट्रेनची अलार्म चेन खेचू शकता.
4. रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला खूप ताप आल्यास किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर अशा वेळी तुम्ही ट्रेनचा अलार्म खेचू शकता.
5. याशिवाय ट्रेनमध्ये चोरी किंवा दरोडा पडला असेल तर या स्थितीतही तुम्ही ट्रेन चेन खेचू शकता.
Technology : भारतीय युजर्सनी ‘Alexa’ला विचारले भन्नाट प्रश्न; जाणून…कपाळावर हात मारून घ्याल!
अशा परिस्थितीत तुम्हाला ट्रेन अलार्म चेन पुलिंगच्या या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान ट्रेन थांबवण्यासाठी चेन पुलिंग करत असाल तर तो मोठा गुन्हा आहे. दोषी आढळल्यास तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.