#video : विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’चा टीझर प्रदर्शित

चित्रपटातील विद्याचा नवीन लूक भावणार

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणिताच्या जादूगार शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर तयार केलेल्या या चित्रपटाचा टीझर आणि चित्रपटाचा विद्याचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

विद्या बालनने चित्रपटाचा टीझर तिच्या ट्‌विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. शकुंतला देवीचा परिचय टीझरमध्ये देण्यात आला आहे. त्याच्या कौशल्यांचा परिचयही आहे.  याचित्रपटात देखील विद्याचा साडीतील लूक सर्वांना पहायला मिळणार आहे. परंतू, यावेळी साडीत असूनही विद्या बालन वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉब हेअरकट आणि साडीमध्ये विद्या शंकुंतला देवीसारखी दिसत आहे.

शकुंतला देवी ही एक भारतीय लेखक आणि मानसिक कॅल्क्‍युलेटर होती. त्यांच्यात मनातल्या प्रत्येक गोष्टीची गणना करण्याची आश्‍चर्यकारक क्षमता असल्यामुळे त्यांना मानव संगणक म्हणून ओळखले जात होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.