वेलिंग्टन : भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील टी-२०, एकदिवसीय मालिकेनंतर आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आजपासून बेसिन रिझव्र्ह येथे सुरू होणार अाहे. पहिल्या कसोटीचा नाणेफेकीचा कौल (टाॅस) न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
भारतीय संघात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान मिळालेलं आहे.तर, वृद्धीमान साहाऐजी ऋषभ पंतला या सामन्यात संधी देण्यात आलेली आहे. ईशांतने दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे.
1st Test. India XI: M Agarwal, P Shaw, C Pujara, V Kohli, A Rahane, H Vihari, R Pant, R Ashwin, M Shami, I Sharma, J Bumrah https://t.co/tW3NpQr6Sl #NZvInd
— BCCI (@BCCI) February 20, 2020
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, रविचंद्रन अश्विन.
दुसरीकडे वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्यात केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ वाकबगार आहे. त्यांच्या संघात ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि कायले जॅमीसन या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.
1st Test. New Zealand XI: T Latham, T Blundell, K Williamson, R Taylor, H Nicholls, BJ Watling, C de Grandhomme, K Jamieson, T Southee, A Patel, T Boult https://t.co/tW3NpQr6Sl #NZvInd
— BCCI (@BCCI) February 20, 2020
न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, बीजे वॉटलिंग.
दरम्यान, सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत अग्रेसर असून, त्यांच्या खात्यावर ३६० गुण जमा आहेत. भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.