नवी दिल्ली – कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारच्या धोरणांवर फेसबुक पोस्टवर टीका करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. खरे तर या शिक्षकाने अनेक माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात सरकारी तिजोरीवर कर्जाचा उल्लेख केला होता. यामध्ये सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात सर्वाधिक सरकारी कर्जाचा उल्लेख करण्यात आला आहे.
यासंदर्भातील पोस्ट केल्याने सदर शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. विशेषत: सरकारच्या फुकट योजनांच्या आश्वासनांवर सदर सरकारी शिक्षकाने मोठे प्रश्न उपस्थित केले होते. त्यात असे म्हटले होते की, सरकारच्या फुकट योजनांच्या आश्वासनांमुळे राज्यावरील कर्ज वाढते आहे. जर सरकारवर लक्षावधीचे कर्ज आहे, तर या पाच फुकट योजनांसाठी ते निधी आणणार तरी कोठून?
शिक्षक म्हणाले की, एसएम कृष्णा ते जगदीश शेट्टर यांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज 71,331 कोटी रुपये होते, परंतु सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात2013 ते 2018 दरम्यान ते कर्ज दोन लाख 42 हजार कोटी रुपयांवर पोहोचले. असे असताना सिद्धरामय्या यांनी विविध सुविधा मोफत देण्याची घोषणा कशी काय केली?
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “कर्नाटकमधील एका सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकाला सीएम सिद्धरामय्या यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या फेसबुक पोस्टमुळे निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी एवढेच निदर्शनास आणून दिले की, आता कर्नाटकातही सूडाचे राजकारण सुरु झाले आहे.