बेंगळुरू (कर्नाटक) – लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलण्यासाठी भाजप सत्ताधारी काँग्रेस आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांची ऑफर देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. (‘Operation lotus’ In Karnataka? Siddaramaiah Says ’50 Cr Offered to Woo Congress MLAs,’ BJP Denies)
कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन कमळ सुरू असून त्यासाठी ही ऑफर देण्यात आल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केला असल्याने तेथे पुन्हा खळबळ माजली आहे. तथापि हा दावा फेटाळून लावत, विरोधी पक्षनेते आर. अशोका यांनी भाजपने असा कोणताही प्रयत्न चालवला नसल्याचा खुलासा केला आहे.
शनिवारी एएनआयशी बोलताना अशोका म्हणाले, “काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत आहे, म्हणूनच ते (सिद्धरामय्या) असे निराधार दावे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी या ‘ऑपरेशन कमला’चे स्वप्न पाहिले आहे.
या सरकारला अस्थिर करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. खरे तर ते स्वतःच्याच सरकारला विध्वंसाकडे नेत आहेत. आम्ही काँग्रेसच्या एकाही आमदाराला कोणतीही ऑफर दिलेली नाही. अशी कोणतीही कारवाई आमच्या विचारात नाही असे ते म्हणाले.