पिंपरी – राज्यभरातील 119 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. त्यापैकी दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदलीनंतर रिक्त होणाऱ्या पदांवर केवळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शहरात येत आहेत. तर अन्य एक पद नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी अध्यादेश काढला आहे.
पोलीस आयुक्तालयातील चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची उप विभागीय अधिकारी, चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत श्रीराम अमृतकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची उपविभागीय अधिकारी, नंदूरबार येते नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन सहाय्यक आयुक्तांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग (सोलापूर ग्रामीण) विशाल शामराव हिरे व जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक भास्कर प्रभाकर डेरे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी चिमूर याठिकाणी तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत श्रीराम अमृतकर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. हे दोन्ही जिल्हे देशाच्या गृह मंत्रालयाने नक्षलग्रस्त जाहीर केले आहेत.