नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या स्वदेशी क्षेपणास्त्र-नाशक आयएनएस मोरमुगाओने (INS Mormugao) समुद्रात सुपरसॉनिक तरंगणारे लक्ष्य यशस्वीरित्या भेदले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आयएनएस मोरमुगाओ ही क्षेपणास्त्र-नाशक युद्धनौका भारतीय नौदलाला समर्पित केली होती.
आयएनएस मोरमुगाओ पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यातील ऐतिहासिक बंदर शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या बंदराचे मूळ गाव मार्मागोवा असे आहे.
भारतातच बांधलेल्या आणि पुर्णपणे विकसित करण्यात आलेल्या बलाढ्य युद्धनौकांपैकी एक आयएनएस मुरमुगाव हि 7,400 टन वजनाची युद्धनौका असून ती 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे.
ही युद्धनौका ब्रह्मोस आणि बराक-8 सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. तसेच या नौकेवर इस्रायलचे एमएफ-स्टार रडारने सुसज्ज ठेवण्यात आले आहे, जे हवेतील लांब पल्ल्याचे लक्ष्य शोधू शकते.