शिक्षकांच्या मागण्यांसाठी ‘टीडीएफ’चे साकडे

राज्याचे अप्पर सचिव यांना संघटनेतर्फे निवेदन सादर

तळेगाव स्टेशन – कोविड-19′ च्या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांच्या विविध समस्या व अडचणींच्या सोडविण्यासाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे टीडीएफ व पुरोगामी महाविकास आघाडीचे जी. के. थोरात यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्याचे अप्पर सचिव यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक आजार यादीमध्ये “कोविड-19’चा समावेश करावा. सर्व शिक्षकांना कोविड ड्युटीतून मुक्‍त करण्यात यावे, पुणे विभागातील कोविड सेवेतील मृत्यू पावलेल्या शिक्षकांना तातडीने विमासुरक्षा कवचाचा लाभ मिळावा. अनुकंपा अंतर्गत कुटुंबातील व्यक्‍तीस तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कोविड-19 ड्युटीवरील कर्मचारी यांची करोनाग्रस्त अथवा क्‍वारंटाइन कालखंडातील रजा न धरणेबाबत आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आयुक्‍त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयुक्‍त कार्यालय अधीक्षक राजेश शिंदे यांनी स्वीकारून यावर तत्काळ शासन स्तरावरून मागण्या संदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन दिले.

यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जी. के. थोरात, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे प्रा. राजेनिंबाळकर, टीडीएफचे हडपसर विभाग अध्यक्ष गिरमे, टीडीएफचे राज्य प्रतिनिधी प्राचार्य शिवाजीराव कामथे, शहर संघटक अशोक धालगडे, पुणे शहर “टीडीएफ’चे सचिव संतोष थोरात व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.