तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – शाळांमध्ये आतापर्यंत विद्यार्थीच गणवेशात दिसून यायचे; पण आता राज्यात असलेल्या शाळेतील शिक्षक संवर्गासाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आला आहे. त्यामुळे यापुढील काळात गुरुजींनाही शालेय गणवेशात शाळेत यावे लागणार आहे. त्यासंदर्भात आता काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. गुरूजींच्या गणवेशाचा रंग ठरविण्याचा निर्णय हा शाळास्तरावर सोपविण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पत्र पाठविले केले.
शिक्षकवृंद हा शाळेतील नव्हे तर समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक भावी पिढी घडविण्याचे काम करतात. जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी त्यांचा संपर्क येत असतो. नियमित संवादही होत असतो. विद्यार्थी हा अनुकरणीय असल्याने शाळेतील शिक्षकांनी योग्य पेहरावात असणे आवश्यक आहे. पेहराव हा पेशाला अनुकूल आणि साजेशा असणे अपेक्षित आहे.
यातून शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. शिक्षक संवर्गासाठी गणवेशासंदर्भात मार्गदर्शन सूचना दिलेल्या असून पत्रही पाठविले आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षक गणवेशात दिसणार आहे. शासनाच्या शिक्षक संदर्भातील ड्रेस कोडच्या निर्णयाला सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे.
नेहमीच्या वातावरणातून काहीसा बदल होताना दिसत आहे. यामुळे शैक्षणिक काही दिवसाआधीच राज्य शासनाने एक राज्य, एक गणवेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे.
काही शाळांमध्ये यापूर्वीच ड्रेसकोड
मावळ तालुक्यातील काही खासगी अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये महिला शिक्षक साडी किंवा सलवार कमीज घालून त्यावर संस्थेने दिलेला कोट परिधान करण्यात येत आहे. त्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांना यापूर्वीच ड्रेसकोड लागू आहे.
कसा असावा गणवेश ?
शिक्षकांनी हलक्या रंगाचे शर्ट, गडद रंगाचा फुलपॅन्ट, ट्राऊझर इन केलेला असावा. पायात बुट तर महिलांसाठी साडी, सलवार कमीज, दुपट्टा, चप्पल किवा आवश्यक असल्यास बुट परिधान करावा. शर्टवर कुठलेही चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे नसावे. गडद रंगाचे कपडे, जीन्स आणि टी शर्ट घालू नये. स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचेच ड्रेस राहणार आहे.
शिक्षकांच्या नावासमोर इंग्रजीत टीआर तर मराठीत टी असे लिहिण्यात यावे तसेच याबाबत संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर लावता येईल. त्यासाठी आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. तर आता शिक्षक सुध्दा एकाच गणवेशात दिसतील.