पुणे: आयडियाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत टीसीएसने आयडियाजचा तर, सिमेंसने हर्मनचा पराभव करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत शंतनू नाडकर्णीच्या 75 धावांच्या जोरावर टीसीएसने आयडियाजचा 67 धावांनी पराभव केला. टीसीएसने 20 षटकात 3 बाद 185 धावा केल्या.
185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयडियाजचा डाव 20 षटकात 6 बाद 118 धावांत संपला. दुसऱ्या लढतीत सौरभ जोगळेकरच्या 45 धावांच्या बळावर सिमेंसने हर्मनचा 5 गडी राखून पराभव केला.