मुंबई : करोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला असून कोरोनाने अनेकांना फारच वाईट दिवस दाखवले आहेत. कुटुंबातील कर्तीसवरती माणसे डोळय़ादेखत निघून जात आहेत. तर माता-पिता, भाऊ-बहीण असे सामुदायिक मृत्यू होत असल्याने हसत्या-खेळत्या कुटुंबांवर स्मशानकळा येताना दिसून येत आहेत. यासह करोनाकाळात अनेक फ्रंट लाईन वर्कर्सनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर टाटा स्टील कंपनी कडून कंपनीच्या कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार असल्याची घोषणा टाटा स्टील कडून करण्यात आली आहे.
#TataSteel has taken the path of #AgilityWithCare by extending social security schemes to the family members of the employees affected by #COVID19. While we do our bit, we urge everyone to help others around them in any capacity possible to get through these tough times. pic.twitter.com/AK3TDHyf0H
— Tata Steel (@TataSteelLtd) May 23, 2021
या संदर्भात टाटा स्टील व्यवस्थापकाडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये “कोरोना महामारीच्या कठिण काळात टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यामुळे आपण सर्वजण मिळून उत्तम भविष्य निर्माण करु शकू. टाटा स्टील सामाजिक सुरक्षेतंर्गत आपल्या कर्मचार्यांना मदत करण्यासाठी शक्य ती पावलं उचलून पुढाकार घेणार आहे. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या उत्तम भविष्यासाठी टाटा स्टीलनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. करोना मुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत पगार मिळणार म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या 60 वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे. यासोबतच जर त्या कर्मचाऱ्याच्या वारसदाराला सर्व वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. कंपनीकडून घर देण्यात आले असेत तर ते घर सुद्धा कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयापर्यंत त्या कुटुंबीयांना राहता येईल.
टाटाने फ्रंट लाईन वर्कर्ससाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना एखाद्या फ्रंटलाईन वर्करचा मृत्यू झाला तर कंपनी व्यवस्थापन पदवीपर्यंत त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेणार असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार आहे.
कंपनी व्यवस्थापन नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांच्या हितासाठी कार्यरत आहे. कोविडच्या या साथीच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचार्यांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रयत्न करत आहे. हे ज्ञात आहे की टाटा स्टील नेहमीच आपल्या कर्मचार्यांच्या चांगल्या भविष्यासाठी कार्य करते. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे जी आठ तास काम, नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचार्यांना प्रसूती रजा लागू करते. जे नंतर देशातील इतर कंपन्यांनी स्विकारलं. असे टाटा स्टीलकडून माहिती देण्यात आली आहे. करोना काळात टाटाकडून अनेक प्रकरची मदत कर्मचाऱ्यांसह देशाला सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे टाटांचे सर्विकड़ून कौतुक होत आहे.