नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी तरणजितसिंग संधू यांची निवड करण्यात आली. ते हर्षवर्धन श्रींगला यांची जागा घेतील. श्रींगला हे पुढील परराष्ट्र सचिव असतील.
संधू हे 1988 च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. ते सध्या श्रीलंकेत उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. भारताचे अमेरिकेशी संबंध दृढ होत असतानाच आणि त्याचवेळी इराणच्या लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येनंतर काही बाबतीत संबंध ताणले असताना ही नियुक्ती करण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यामच्या संभाव्य भारत भेटीसंदर्भात दोन्ही देशात सध्या चर्चा सुरू आहे. श्रीलंकेत कार्यरत होण्यापुर्वी त्यांनी अमेरिकेत काम केले होते.
भारताच्या परराष्ट्र सेवेतील मावळते परराष्ट्र सेवेबद्दल मंगळवारी परराष्ट्रमंत्री विजय गोखले यांचे काम पाहतील. त्यानंतर अडीच वर्षे श्रींगला या पदावर कार्यरत होतील.