प्रेमी युगलाची केली ‘शुर्पणखा’

नवी दिल्ली : अयोध्येतील पिप्रा गावात एका विवाहित महिलेचे आणि तिच्या प्रियकराचे नाक कापण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी जोडप्याला रुडौली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिप्रा गावातील विवाहित महिलेचे गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. महिला 5 मुलांची आई असून तिचा नवरा सौदी अरेबियात नोकरी करतो. महिलेच्या प्रेमसंबशांची माहिती तिच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी दोघांना घरात आपित्तजनक स्थितीत पहिले.

सोमवारी रात्री उशीरा ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी दोघांना घरातच चोप दिला. यानंतर दोघांना झाडाला दोरीने बांधून त्यांचे नाक कापण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी जखमी जोडप्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यांनतर लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here