तारा सुतारियाचा 25 वा वाढदिवस मालदिवमध्ये

अभिनेत्री तारा सुतारियाचा 25 वा वाढदिवस गुरुवारी मालदिवमध्ये साजरा झाला. मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर तिने केलेले फोटोसेशन सोशल मिडीयावर पोस्ट केले आणि तिच्या फॅन्सनी त्याला मनापासून लाईक देखील केले आहे. बिकीनीतील या फोटोंना ताराने “बीच/ बर्थ डे बेबी’ अशी कॅप्शन दिली आहे.

तिच्या या फोटोंवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी कॉमेंट केल्या आहेत. तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव देखील होतो आहे. कपूर खानदानाशी अतिशय जवळचे संबंध असलेल्या ताराला करीना कपूरनेही शुभेच्छा दिल्या आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरची सुटी तारा मालदिवमध्ये एन्जॉय करण्याचे ठरवले आहे. सध्या ती निवांत असली तरी काही दिवसात ती बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार आहे.

यापूर्वी “मनमर्जिया’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्राबरोबर तारा सुतारिया दिसली होती. आता नवोदित आहन शेट्टीबरोबर ती दिसणार आहे. मोहित सुरीच्या “एक व्हिलन 2′ मध्येही ती असणार आहे. या सिनेमात दिशा पटणी, जॉन अब्राहम आणि आदित्य रॉय कपूर देखील असणार आहेत. मात्र या सिनेमांचा अन्य तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. तारानेही तिच्या आगमी प्रोजेक्‍टबाबत काही अपडेट दिलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.