अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्याया अभिनय कौशल्यांच्या बळावर सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. नाम शबाना, गाझी अटॅक, पिंक या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. अभिनयात निपुण असलेल्या तापसीला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ती जगभरामध्ये भ्रमंती करत असते. भ्रमंतीवर असताना आपल्या फॅन्सना त्याबाबत अपडेटेड ठेवायला देखील तापसीला आवडत. हे सर्व सांगण्याचं कारण की, फ्री सोल असलेली तापसी पुन्हा एकदा सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर पडली आहे. यंदा तिचं ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे कोपनहेगन, डेन्मार्क!
१८ तासांचा विमान प्रवास संपताच तापासीने पेट पूजा करण्यासाठी थेट रेस्टोरंट गाठलं. आपली ऑर्डर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तापसीने आपला भुकेजल्या चेहऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने १८ तास पोट रिकामं ठेऊन सुट्टीतील पहिल्या भोजनावर ताव मारायला पोहोचलेय. व्हाईट शर्ट व त्यावर लाईट ब्राऊन कलरचा स्वेटर परिधान केलेली तापसी फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.
तापसीची ही ट्रिप सोलो ननससुन तिच्यासोबत बहीण शगुन सुद्धा व्हॅकेशनसाठी आली आहे. सध्या या दोघीही कोपनहेगन एक्स्प्लोअर करत असून त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. दिवसभर फिरून झाल्यानंतर रात्री दोघी बहिणींनी मेट्रोने प्रवास केल्याचीही पोस्ट केली आहे.