बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरते. अगदी वेस्टर्न आऊटफिटपासून ते भारतीय पोषाखांपर्यंत सर्वच प्रियांका व्यवस्थित कॅरी करतांना दिसते. तिच्या याच फॅशन सेन्सची तारीफ तिचे फॅन्स सोशल मीडियावर करताना दिसतात. अशातच आता देसी गर्ल प्रियांकाने आपला एक थ्रो-बॅक फोटो शेअर केला आहे.
मालदीवमध्ये शूट केलेल्या या फोटोमध्ये प्रियांकाने गोल्डन कलरची बिकिनी परिधान केली आहे. हा फोटो तब्बल 22 वर्षांपूर्वीचा असून त्यावेळी प्रियांका केवळ १८ वर्षांची होती. प्रियांकाने शेअर केलेल्या याला फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. केवळ फॅन्सचं नव्हे तर दिग्ग्गज सेलिब्रिटींना देखील प्रियांकाच्या या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही.
या फोटोवर प्रियांकाचा पती निक जोनास याने कमेंट करताना तिचा हा फोटो खूपच हॉट असल्याचं म्हटलंय. तर अभिनेता रणवीर सिंगने पंजाबी स्टाईलमध्ये कमेंट करताना ‘बृ$हा…’ असं लिहलंय. रणवीरची ही कमेंट वाचून प्रियांकाने डोक्याला हात लावल्याचा मजेशीर इमोजी कमेंट केलाय.
यापूर्वी प्रियांकाने ब्लॅक अँड व्हाईट रफल्ड गाऊनमधील शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा रंगली होती. माधुरी दीक्षित, विद्या बालन, परिणीती चोप्रा यांनी प्रियांकाच्या रफल्ड गाऊनमधील फोटोचे तोंड भरून कौतुक केले होते.