मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ताने मी टू प्रकरणात अभिनेता नाना पाटेकर यांचे नाव घेऊन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तनुश्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तनुश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट चांगल्याच व्हायरल होताहेत. अशात एका पोस्टमध्ये तनुश्रीने पुन्हा एकदा अभिनेता नाना पाटेकरचे नाव आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये घेऊन चर्च्यांना नवीन तोंड फोडले आहे.
तनुश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहीत बॉलीवूडमधील माफियांवर निशाणा साधला आहे. तनुश्रीने तिच्या फोटोसह इंस्टाग्रामवर लिहिले- ‘मला कधी काही झाले तर मी तुम्हाला सांगतो की #metoo आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार आहेत, कोण आहे बॉलीवूड माफिया?? एसएसआर मृत्यू प्रकरणात ज्यांची नावे पुन्हा पुन्हा आली तीच लोकं.’
View this post on Instagram
तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये पीआर आणि पत्रकारांना देखील दोषी मानले आहे. ती म्हणते असे पत्रकार आणि पीआरवाले देखील त्यांच्या सोबत आहेत. शेवटी तनुश्री म्हणते कायदा आणि न्यायाने जरी मला निराश केलं असलं तरी मला या राष्ट्रातील लोकांवर विश्वास आहे. जय हिंद.. पुन्हा भेटू असे देखील तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.