मुंबई – सगळ्यांना माहित आहे की बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे हे बेस्ट फ्रेंड आहेत. या तिघी बालपणापासून चांगल्या मैत्रिणी आहे, त्या बराच वेळ एकत्र घालवत असतात. अनन्या पांडेचे तिची मैत्रिण सुहाना खानचा भाऊ आर्यन खानसोबत चांगले संबंध आहेत. पण अनन्या पांडेला भाऊ आर्यनवर क्रश होता.’
कॉफी विथ करण या शोमध्ये अनन्या पांडेने याचा खुलासा केला होता. सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्या फ्रेंड्सशिप विषयी बोलल्यानंतर करण जोहरने अनन्याला विचारले,’तुमच्यापैकी कोणत्याही मुलीला सुहाना खानचा भाऊ आर्यनवर क्रश नव्हते का? यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली ,’तो क्यूट आहे. होय, आर्यन खानवर मला क्रश होते. यानंतर करण जोहरने विचारले,’पण मग क्रशनंतरही पुढे काय झाले? अनन्या लगेच म्हणाली,’आर्यनला विचारा.’
कॉफी विथ करणमध्ये अनन्या पांडेच्या लव्ह लाईफचा खूप उल्लेख झालाय. शोचा लेटेस्ट एपिसोड पाहिल्यानंतर, तुम्हाला तिच्या रिलेशनशिप स्टेट्सबाबत कळेल. करण जोहरने अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांच्या अफेअरला दुजोरा दिला. मात्र, अनन्याने या बाबत काहीच सांगितले नाही. ईशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडेची कार्तिक आर्यनसोबतची जवळीक वाढली होती, असेही कळते. पण अनन्याने कार्तिकला चांगला मित्र म्हटले. तर पुढे आदित्य आणि अनन्यामध्ये काहीतरी शिजत असल्याचं करणने या भागात सांगितले. मात्र अनन्याने शोमध्ये अनेकदा सांगितले की ती सिंगल आहे आणि सिंगल राहून खूप आनंदी आहे.