राहुरी – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अरुण साहेब तनपुरे तर उपसभापतीपदी गोरक्षनाथ तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती व उपसभापतीपदाची निवड होताच कार्यकर्त्यांकडून फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने 16 जागा जिंकल्यानंतर या निवडीची फक्त औपचारिकता उरलेली होती. ती आज पार पडली.
गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून बाजार समितीची सूत्रे अरुण तनपुरे यशस्वीपणे सांभाळत आहेत.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप रुद्राक्ष यासह सहाय्यक म्हणून बी. ए. जरे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित संचालक सुरेश बाफना, दत्तात्रय कवाणे, सुनिता खेवरे, सत्यजित कदम, शामकाका निमसे, दत्तात्रय शेळके, रखमाजी जाधव, मंगेश गाडे,शारदा आढाव, बाळासाहेब खुळे, मारूती हारदे, चंद्रकांत पानसंबळ, मधुकर पवार, महेश पानसरे, रामदास बाचकर, शोभा डुक्रे उपस्थित होते.
सभापती तनपुरे व उपसभापती पवार यांचा मल्टीस्टेट फेडरेशचे अध्यक्ष सुरेश वाबळे, प्रभाकर पानसंबळ, डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक विजय डौले, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, संदीप सोनवणे, आण्णासाहेब बाचकर, सुभाष डुक्रे, सचिन भिंगारदे, विजय माळवदे, अशोक ढोकणे आदींनी सत्कार केला. बाजार समितीच्या आवारातील डॉ.दादासाहेब तनपुरे यांच्या पुतळ्याला सभापती तनपुरे आणि सर्व संचालकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.