म्हसवड – नागोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेले जंगी कुस्त्यांचे मैदान नागोबा देवस्थान ट्रस्टच्या योग्य नियोजनामुळे उत्साहात झाले. नागोबा केसरीसाठीची कुस्ती देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष ईश्वरा खोत, दत्तूशेठ कोळेकर, सचिव किसन जठरे, मधुकर सोकासने, मेजर मोहन विरकर, बबनशेठ विरकर आदीसह सर्व ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित लावण्यात आली.
कुस्ती मैदानाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात आला.
कुस्ती मैदानाला सुप्रसिद्ध गलई शेठ दत्तू कोळेकर, नागेश कोळेकर, बबनशेठ विरकर, नगरसेवक दीपक बनगर, रासपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब दोरगे, अशोक राजगे, दत्तू कोळेकर, नागेश कोळेकर, सरपंच किसन चव्हाण, उमाजी चव्हाण, आप्पासाहेब विरकर, मनोहर गलंडे, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
श्री नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. तानाजी विरकर विरुद्ध पै. सचिन बगाले यांच्यात कुस्ती रंगली होती. पै. तानाजी विरकरने मच्छी घोटा डावावर सचिन बगालेला आस्मान दाखविले. ही 51 हजार रूपयांची कुस्ती कै. जगन्नाथ बयाजी कोळेकर यांच्या स्मरणार्थ दत्तू कोळेकर व नागेश कोळेकर यांच्यातर्फे लावण्यात आली होती.
दोन नंबर व तिन नंबर साठी खेळविण्यात आलेल्या कुस्त्यां पै. निलेश तरंगे विरूध्द विशाल कोकरे तर पै. महादेव माने विरूध्द सागर तामखडे या सोडविण्यात आल्या. मैदानातील अक्षय विरकर, संदीप विरकर, अनिकेत व्होनमाने, राजेंद्र रूपनवर महेश विरकर, विनायक दिडवाघ, राहूल चोरमले, हर्षल खांडेकर, प्रसाद पुकळे, सचिन विरकर, रोहित विरकर, तुषार जाधव, प्रकाश नरळे, प्रताप खिलारी आदीसह महिला कुस्ती मधून साक्षी सरगर, साक्षी घुटूकडे, ज्योती तांदळे, अस्मिता लोखंडे, रोहिनी विरकर व आकांक्षा
जाधव आदी कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. मैदानात पंच म्हणून वस्ताद रावसाहेब कोळपे, मेजर मोहन विरकर, वस्ताद शिवाजी दिडवाघ, वस्ताद महालिंग खांडेकर, सत्यवान दिडवाघ, वस्ताद पोपट रुपनवर, नवनाथ खांडेकर, दिलीप विरकर, धनाजी बोडरे, हणमंत विरकर, बाळासाहेब काळे, कोंडीबा विरकर, बिरा गोरड, धनाजी विरकर, अरूण विरकर यांनी काम पाहिले.