मॉस्को – रशियाचे अध्यक्ष वलादिमीर पुतीन नेहमीच चर्चेत असतात रशिया आणि युक्रेल यांच्यातील लष्करी संघर्ष सुरू होता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला असला तरी पुतीन यांना आपल्या जीवाची काळजी असल्याने त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आलिशान, सुरक्षित आणि भक्कम अशी ट्रेन तयार केली आहे ही ट्रेन केवळ सुरक्षित आहे असं नाही.
तर अत्यंत आलिशान आहे मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनमध्ये जे बाथरूम आहे ते तयार करण्यासाठी तब्बल 33 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे सुरक्षेच्या कारणावरून ब्लादिमीर पुतीन देशांतर्गत प्रवास करताना नेहमीच या ट्रेनचा वापर करतात ही ट्रेन संपूर्णपणे बुलेटप्रूफ असून त्यावर कोणत्याही बॉम्बचा किंवा गोळीबाराचा परिणाम होऊ शकत नाही पुतीन यांची ही ट्रेन जरी बऱ्यापैकी जुनी असली नुकतीच या ट्रेनवर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करून त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
पुतीन यांच्या खाजगी विमानाप्रमाणेच या ट्रेनलाही कोणत्याही रडारवर किंवा अत्याधुनिक उपकरणांवर ट्रॅक करता येत नाही ट्रेनमध्ये सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून ठेवण्यात आल्या आहेत ट्रेनमध्ये नुकतीच जेव्हा सुधारणा करण्यात आली तेव्हा त्याच्यामध्ये एक चित्रपट गृह बांधण्यात आले ज्यामध्ये दीडशे लोकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे ही ट्रेन दीडशे किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकते सुरक्षेच्या कारणावरून या ट्रेनचा वेग कमी ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात येते.