नवी दिल्ली : देशातील करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांकडून चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यातच देशात शनिवारी दिवसभरात 12 हजार 899 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, सध्या एकूण 72 हजार 474 सक्रिय रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. तर 8 हजार 518 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/JV2EgITq5E pic.twitter.com/Ms2HomzugF
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 19, 2022
देशातील करोनाबाधितांची संख्या किंचित घसरली आहे. आदल्या दिवशी 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे, पण मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग आणखी वेगवान होताना दिसत आहे. दिवसागणिक करोना संक्रमणाचा वेग वाढत चालला आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 11 जून ते 17 जून दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा 72 टक्क्यांनी वाढला आहे. ही चिंताजनक बाब आहे.