मुंबई – अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करणारी अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ ही तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला त्यामुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक करतात. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर टीका केली आहे. तसेच उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.
दरम्यान, आता चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट आकाउंटवर शेअर केली आहे.
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. दरम्यान, आता मुंबई पोलीस या मागणी अंतर्गत अभिनेत्री उर्फी जावेद हिच्यावर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
चित्रा वाघ यांचं ट्विट
‘शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हीला..एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये’ असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.