मुंबई : राज्यात कोरोनाने आपले पाय घट्ट रोवले असल्याचे दिसत आहे. कारण रोज कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यांनी आपला आलेख चढताच ठेवला आहे. त्यातच मागील २४ तासांत पुन्हा एकदा राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले आहे.#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 18, 2021

आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के झाले आहे.राज्यात आज मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 8479 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाक 78 हजार 39 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्के आहे. सध्या 87 हजार 698 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 45 दिवस आहे.