कॅनबेरा : गोलंदाजीनंतर फलंदाजीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पाकिस्तान महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात वेस्टइंडिजचा ८ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. जवेरिआ खान ही सामन्याची मानकरी ठरली.
The veterans finish it off for Pakistan – a solid eight-wicket victory for them 🙌
Bismah Maroof plays a captain's knock, finishing unbeaten on 38.#WIvPAK | #T20WorldCup
📝 https://t.co/bsE4Jl1CZ4 pic.twitter.com/uwNnB4i29b
— T20 World Cup (@T20WorldCup) February 26, 2020
विजयासाठीचे १२५ धावांचे आव्हान पाकिस्तान महिला संघाने १८.२ षटकात २ बाद १२७ धावा करत पूर्ण केले. पाककडून जवेरिआ खानने ३५(२८), बिस्माह मारूफने नाबाद ३८(३७), मुनिबा अलीने २५(२६) आणि निदा दारने नाबाद १८(२०) धावांची खेळी केली. विंडिजकडून एफी फ्लेचर आणि स्टेफनी टेलर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, वेस्टइंडिज महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या होत्या. विंडिजकडून शिमेन कैम्बल हिने ४३(३६), स्टेफनी टेलरने ४३(४७) धावांची खेळी केली. पाककडून गोलंदाजीत डायना बेग, ऐमन अनवर आणि निदा दर यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.